लहू बालवडकर यांनी वारकऱ्यांसाठी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीम पाठवत वारकऱ्यांच्या सेवेतून घडवली आजीची वारी.

0
slider_4552

बालेवाडी :

पंढरपूरची वारी म्हंटले की अवघा महाराष्ट्र विठू माऊलीच्या गजरामध्ये अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो. ‘ज्ञानबा तुकाराम’ जयघोषात अवघा महाराष्ट्र न्हाहुन निघतो. महाराष्ट्रातील अबाल वृद्ध वय विसरुन विठुनामाच्या गजरामध्ये तल्लीन होतो. बालेवाडी तील बहुसंख्य महिला पुरुष या वारीमध्ये सहभागी होत असतात. आपल्या ९५ वर्षाच्या आजीची वारीला जाण्याची इच्छा यावर्षी शारिरिक वृद्धपकाळाने पूर्ण होणार नाही हे पाहून भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी वारीला जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीम वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाठवत आपल्या आजीला वारीला न जाण्याची खंत दूर करण्यासाठी वारकऱ्यांच्या सेवेतून वारी घडवली आहे.

याची माहिती देताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर म्हणाले की, माझी आजी श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर गेली २५ वर्षे नित्य नियमाने वारी करून पांडुरंगाच्या भेटीस जात होती. परंतु यावर्षी शारिरिक वृद्धपकाळाने वारीमध्ये टाळ मृदुंगाचा नाद, आणि लाखो भक्तांच्या गर्दीत जावू शकणार नव्हती. वारीची चर्चा सुरू असताना आजी म्हणाली मी नाही जाऊ शकत यंदा वारीला पण ज्या लाखो माता, भगिनी जात आहेत त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का? कोरोनाचे सावट अजुन संपूर्ण नष्ट झाले नाही, थंडी, ताप, खोकल्याची साथ आहेच, पांडुरंगा संभाळ रे बाबा!! या वाक्याने तरी लाखो वारकरी माता भगिनींसाठी फुल न फुलाची पाकळी आपल्या सेवेरूपी अर्पण करण्याचा निश्चय केला.

तात्काळ माझे मित्र नवनाथ बोडके व त्यांच्या सहकार्यांशी संपर्क केला व एक रूग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक तयार करून वारीतील माता, भगिनी यांच्या सेवेसाठी पाठवण्याची व्यवस्था केली. सासवड ते पंढरपूर या संपुर्ण वारीमार्गावर ही रूग्णवहिका आणि डॉक्टरांचे पथक सर्वांना प्राथमिक आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी कार्यरत असेल.
आजीची वारी यंदा होणार नाही पण रूग्णसेवेची वारी मात्र सुरू झाली आहे. आजीच्या हस्ते ही रूग्णवाहिका सेवेसाठी अर्पण करित असताना तिच्या चेहर्यावर वारीच्या पुर्णत्वाचा, विठ्ठलाच्या भेटीचा आनंद होता!

See also  नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर व खंडेराय प्रतिष्ठानचे गणपत बालवडकर यांचा पतसंस्था व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान.

अश्याच वेगळ्या पद्धतीने समाज सेवेसाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या लहू बालवडकर यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या कृतीतून जणू आपल्या आजीची वारीच पूर्णत्वास नेत आहे. जणू एक भक्त विठ्ठलाच्या भेटी शिवाय राहु शकेल पण विठ्ठल राहु शकेल का भक्ताच्या भेटीशिवाय? सासवड ते पंढरपूर या मार्गावर दररोज वारकऱ्यांच्या सेवेतून विठ्ठलाची भेट नक्की घडेल!

यावेळी कांतीलालशेठ बालवडकर, ह.भ.प.मच्छिंद्र बालवडकर, विठ्ठल मांगडे, ह.भ.प.संतोष बा.बालवडकर, गजानन बालवडकर, रंजना बालवडकर, विद्या बालवडकर, ताईबाई बालवडकर, ज्ञानेश्वर बालवडकर, नितीन रणवरे, नवनाथ बोडके, शरद मांगडे, राजेंद्र मांगडे, पै. योगेश बालवडकर, संतोष भ.बालवडकर, पै.किरण बालवडकर, दिनेश बालवडकर, पै. चेतन बालवडकर, विठ्ठल बालवडकर, रोहित बालवडकर पै योगेश मांगडे शाम बालवडकर जीवन बालवडकर, आकाश बालवडकर, सौरभ कवडे, संदिप कांबळे, सुरज मांगडे, श्रीकांत नायकोडे, किरण खंडागळे, अक्षय काळे, पवन जोध, पिराप्पा माकन आणि लहु बालवडकर सोशल वेल्फेअर चे सर्व सदस्य उपस्थित होते.