नितीन रणवरे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित योग शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न.

0
slider_4552

औंध :

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नितीन प्रकाश रणवरे मित्रपरिवार आणि योग विद्या गुरुकुल नाशिक प्रमाणित अर्हम योगा सेंटर औंध यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २५/६/२०२२ रोजी सानेवाडी क्रीडांगण औंध येथे “योगा शिबिर” मोठया उत्साहात संपन्न झाले.

या वेळी बोलताना भाजपा युवा नेते नितीन रणवरे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग दिन साजरा होतो. म्हणुनच आपल्या औंध बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजन केले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. योगा करणे हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. आपल्या असंख्य शारीरिक व्याधी योगा मुळे कमी होतात. पुढील काळात देखील सर्वांनी योगा नित्य नियमाने करावा अशी विनंती आहे. जागतीक योगा दिवस दरवर्षी मोठया प्रमाणावर साजरा करत राहणार आहे.

योग विद्या गुरुकुल च्या योग प्राध्यापिका छाया भंडारी यांनी योगाची प्रात्यक्षिके सगळ्या उपस्थित नागरिकांकडून करून घेतली. प्रत्येक योगा प्रकारचे फायदे समजून सांगितले.

See also  औंधगाव" ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव " शासकीय नियमांचे पालन करून साधे पणाने साजरा.