औंध :
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नितीन प्रकाश रणवरे मित्रपरिवार आणि योग विद्या गुरुकुल नाशिक प्रमाणित अर्हम योगा सेंटर औंध यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २५/६/२०२२ रोजी सानेवाडी क्रीडांगण औंध येथे “योगा शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराची माहिती देताना भाजपा युवा नेते नितीन रणवरे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग दिन साजरा होतो. म्हणुनच आपल्या औंध बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना आकर्षक भेटवस्तू देखील देणार आहे. योग शिबिरांमधून नागरिकांमध्ये योगाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे जेणेकरून आपले आरोग्य मन यास सुख शांती लाभावी अशी अपेक्षा आहे. म्हणूनच जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन मार्गदर्शन घ्यावे अशी नम्र विनंती आहे.
शनिवार दिनांक २५/६/२०२२ रोजी सकाळी ६.५५ वाजता सानेवाडी ग्राउंड औंध येथे योग विद्या गुरुकुल च्या योग प्राध्यापिका छाया भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. तरी नागरिकांनी वेळेत उपस्थित राहावे.