शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने योगा दिन उत्साहात पार.

0
slider_4552

बालेवाडी-म्हाळुंगे :

आज क्रीडा व युवक संचलनालय व अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी म्हाळुंगे येथे पुण्यातील सर्वात मोठा योग दिवस आयोजित करण्यात आला होता.

या योग शिबिरात परिसरातील जवळपास अडीच ते तीन हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी योगदिनाचे औचित्य साधून जगप्रख्यात योग शिक्षिका डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्तम पद्धतीने योगासने केली.

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हा योग दिवस २१ जून रोजी जगभरात साजरा होतो. याच आधारावरती हा योग दिवस २०१४ सालापासून दरवर्षी बाणेर-बालेवाडी, सुस-म्हाळुंगे परिसरात आयोजित केला जातो. मात्र, कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठीण काळात हे शिबीर आयोजित करता आले नव्हते. परंतु यावर्षी नागरिकांनी अत्यंत उत्साहाने या योग शिबिरात सहभाग नोंदविला.

यावेळी दिल्ली येथे आयोजित १७ व्या राष्ट्रीय आईस स्केटींग स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा तसेच सर्व सहभागी संघांचा व मनपा सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.

योग साधनेसोबतच हास्य योगा, झुंबा, आर्टिस्टिक योगा, रिदमिक योगा अशा विविध योगासनांचे आयोजन अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. या योगासनांसाठी परिसरातील नवचैतन्य हास्य योग परिवार, बाणेर-बालेवाडी मेडीकोस असो., बालेवाडी-बाणेर रनर्स ग्रुप, वसुंधरा अभियान, पेडल बस्टर्स आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान पावसाने हजेरी लावली. तरीही सर्वांनी भरपावसात योगासने करून योग दिन साजरा केला याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!

याप्रसंगी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या समवेत संचालक सुहास पाटील, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, मा. नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, भाजपा नेते लहु बालवडकर, गणेश कळमकर, मंदार रारावीकर, अनिल ससार, काळुराम गायकवाड, सुभाष भोळ, डॉ. राजेश देशपांडे, वसुंधरा अभियानचे भुजबळ सर, हास्य योगचे संस्थापक मकरंद टिल्लु, हरिषजी पाठक, माशळकर, रनर्स ग्रुपचे विवेक साळवे, शशिकांत बालवडकर, श्री.सचिनजी मानवतकर, क्रिडा व युवक संचलनालयाचे सर्व पदाधिकारी, खेळाडू व अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

See also  भाजपा प्रभाग क्रमांक ९ महिला पदाधिकारी व लहू बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने नवरात्री निमित्त भोंडला व दांडिया महोत्सव उत्साहात साजरा.