शिवसेना फुटण्याची शक्यता ? एकनाथ शिंदे सह काही आमदार भाजपात जाण्याची शक्यता….

0
slider_4552

मुंबई :

विधानपरिषद निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंभरठ्यावर उभी आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.

सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.

आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आज पुन्हा बैठक

मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचं भविष्य अवलंबून आहे.

See also  कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिसूचनेला मंजूरी