बाणेर, बालेवाडी, पाषाण, बावधन परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद…

0

पुणे :

देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरूवारी (दि. २६) पुणे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर (दि. २७) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे –

चतु:श्रृंगी / एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर :- भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड इत्यादी.

पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग)- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

लष्कर जलकेंद्र पंपींग भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग:- मुळा रोड, खडकी, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

See also  शहरातील सर्व भागात गुरूवार १ जुलैला संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद.