बालेवाडी :
बाणेर येथील वसुंधरा अभियान संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्याची दखल घेऊन शनिवार दि. २१ मे २०२२ रोजी श्री खंडेराय प्रतिष्ठान, बालेवाडी व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या वतीने संस्थेचा सन्मान करण्यात आला.
या बद्दल माहिती देताना डॉ. सागर बालवडकर म्हणाले की, वसुंधरा अभियान संस्थेमार्फत आतापर्यंत ४० हजारहून अधिक देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. जैवविविधता असलेल्या तुकाई टेकडीवर संस्थेच्या सदस्यंनी दररोज परिश्रम करून टेकडीवर हिरवळ निर्माण केली आहे. पर्यावरणात संतुलन राखण्याचे काम वसुंधरा अभियाना द्वारे अविरत केले जाते. निस्वार्थी भावनेने सतत पर्यावरणाची वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून आनंदाने परिश्रम घेणाऱ्या सदस्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून संस्थेचा सन्मान करणे गरजेचे होते. संस्थेचे हे कार्य केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर आपण प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी अनुकरण करावे, असेच आहे. चला तर मग, संस्थेला साथ देऊ, संस्थेच्या कार्यात सहभाग नोंदवू अन् आपला परिसर हिरवाईने नटवू..
यावेळी श्री खंडेराय प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणपत बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, दिलीप फलटणकर, ॲड. माशालकर आणि वसुंधरा अभियान सन्मानीत सदस्य उपस्थित होते.