नंदुबारमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का !

0
slider_4552

नंदुरबार :

नंदूरबारमधील शहादया तालुक्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आजूबाजूच्या अनेक गावात भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी आहे.

शहादा तालुक्यातील सावळदा भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या धक्क्यामुळे कुठेही जीवित हानी झाली नाही. शहादाया चे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी या भागाची पाहणी करून नागरीकांना सुचना दिल्या आहेत.

 

See also  राज्यभरातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार : शिक्षणमंत्री