पुणे :
१ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून किर्लोस्कर कमिन्स एम्प्लाॅईज् युनियन ने
सुवर्णम होत्सवी वर्षानिमित्त”कामगार चळवळीचे जनक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे” याच्या मुळगावी कनेरसर ता. खेड येथे युनियन पदाधिकारी सेक्शन लीडर्स व सभासदांनी त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला तसेच त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतू व गावातील लोखंडे परिवार तसेच कनेरसर ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य , पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी लोखंडे यांचे पणतू व ग्रामस्थ यांनी त्यांच्यां मनोगतात आवर्जून सांगितले की प्रथमच अशाप्रकारे किर्लोस्कर कमिन्स एम्प्लाॅईज युनियनने येथे येऊन कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा केला व रावबहादुर मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिस उजाळा दिल्याबद्दल आभार मानले.परंतू युनियन ने या गावात लोखंडे यांचे स्मारक, पुतळा, स्तंभ नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. लोखंडे यांचे स्मारक या गावात होणेसाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन स्मारक उभारावे अशी आशा किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली…