रेशनिंग दुकानांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची परवानगी : छगन भुजबळ

0
slider_4552

मुंबई :

पुणे विभागातील पुरवठा विभागा अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, व सोलापूर अश्या पाच जिल्हातील रास्त भाव दुकाने आणि कार्यालये यांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक वितरण प्रणालीतील केलेल्या सुधारीत गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतीसाठी आय.एस.ओ-९००१/२०१५ तसेच पुरवठा साखळी व सुरक्षा व्यवस्थापन पद्धती आय.एस.ओ २८०००-२००७ हे ISO नामांकन मिळाले आहे आज या प्रमाणपत्रांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुंबईत वाटप करण्यात आले.

पुणे विभागातील पुरवठा उपआयुक्त यांचे कार्यालय, ५ जिल्हा पुरवठा कार्यालये, २ अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय ६० तहसिल कार्यालये, १५ परिमंडळ कार्यालये व ८० गोदामे असून या सर्व १६३ कार्यालये व गोदामांना आय. एस. ओ. ९००१-२०१५, आय. एस. ओ. २८०००-२००७ हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच ९१६४ रास्तभाव दुकानांपैकी ७९३१ रास्तभाव दुकानांना आय. एस. ओ. ९००१ २०१५ हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. म्हणजेच सर्व कार्यालये व रास्तभाव दुकान यांना एकूण ८०९४ प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत ISO मानांकनाचे कामकाज करण्यात आलेले असून पुरवठा उपायुक्त डॉ त्रिगुण कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे.अश्या प्रकारचे उपक्रम फक्त पुणे विभागच नाही तर सर्व महसूली विभाग आणि खात्यांनी राबवायला हवा. राज्यात पुरवठा विभाग, रास्त भाव दुकान यांच्याबद्दल टीका केली जाते मात्र पुणे विभागाने केलेल्या उपक्रमामुळे विभागाचे आता कौतुक होत आहे.

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सर्व कार्यालये, गोदामे व रास्तभाव दुकाने यांची स्वच्छता, रंगरंगोटी व आदर्श रचना करण्यात आली आहे. कार्यालय व रास्तभाव दुकानांमध्ये CCTV, अग्निशामक यंत्र, स्मोक डीटेक्टर,प्रथमोपचार पेटी, इ. ची व्यवस्था करण्यात आली असून सर्व आवश्यक फलक लावणेत आलेले आहेत. रास्तभाव दुकानदार व गोदाम मधील माथाडी कामगार यांना ओळखपत्र व गणवेश देण्यात आले आहेत.

See also  एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला, एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांची यशस्वी शिष्टाई

रास्त भाव दुकानदार हे फक्त रेशनिंग विकून आपला उदरनिर्वाह करू शकत नाही हे लक्षात घेता राज्य सरकारने सीएससी सेंटरच्या माध्यमातून रास्तभाव दुकानदारांना घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे विमान तिकीट बुकिंग सर्व प्रकारचे बिल्स लाईट बिल, फोन बिल, पाणी बिल, मोबाईल, डीटीएच रिचार्ज, शेती विषयक सर्व सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशन कार्ड, दुबाररेशन कार्ड, नावामध्ये दुरुस्ती अर्ज इत्यादी सर्व सुविधा देण्याची परवानगी दिली आहे अशी माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मुंबईतील मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला यावेळी अन्न,नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे म्हणाले की पुणे विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि रास्त भाव दुकानदार यांनी अनेक दिवस अथक मेहनत घेऊन हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केला आहे. यावेळी ते म्हणाले की स्वच्छ आणि पारदर्शक कारभार असावा असे प्रयत्न करणाऱ्या खात्याचा सचिव असल्याचा मला आनंद आहे. पुढील काळात सर्वच विभागात ISO नामांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी म्हणाले की रास्त भाव दुकानदारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी सहकार्य केल्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. Iso नामांकन बद्दल माहिती देताना ते म्हणाले की सर्व रास्तभाव दुकानांचे वजन माप पडताळणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणेत आलेले आहे. रास्तभाव दुकानदारांना व गोदामातील हमालांना आरोग्य विभागा कडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. सर्व ८० गोदामांच्या आवारामध्ये एकूण ६००० वृक्षारोपण करण्यात आले आहे.सर्व गोदामे, तहसिल कार्यालये, भारतीय खाद्य निगम, परिमंडळ कार्यालये, अन्नधान्य वितरण कार्यालये, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालये या मध्ये पुरवठ्याचे सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे.

सर्व रास्तभाव दुकानदारांना चलन भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रास्तभाव दुकानदार यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोनातून सर्व रास्तभाव दुकानांमध्ये Common Service Centers (CSC) सुविधा चालू केली असून २०००रास्तभाव दुकानांचे रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.