माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांनी केला हल्ला…..

0
slider_4552

मुंबई :

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.

सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल, बाटल्या फेकत घोषणाबाजी केली आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांच्या तोंडाला दुखापत झाली असून त्यांच्या हनुवटीवरून रक्त येत होते.

राणा दाम्पत्याला सांगितल्या प्रमाणे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी खारच्या पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावली. यावर राणांच्या आजच्या या कारस्थानाला भाजपाचा पाठिंबा होता हे सिद्ध झाल्याचा आरोप माजी महापौर महाडेश्वर यांनी केला आहे.

दरम्यान किरीट सोमय्या पोलीस ठाण्यामधून बाहेर आल्यावर संतप्त शिवसैनिकांकडून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी किरीट सोमय्या मधल्या सीटवर बसले होते, तेव्हा त्यांच्या काचेवर दगड भिरकावण्यात आला. यामुळे सोमय्या यांच्या तोंडाला दुखापत झाली आहे.

तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती. असा दावा शिवसैनिकांनी केला आहे. याआधीही पुण्यात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता 5 फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या पुणे महापालिकेत पोहोचले होते. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना अडवले.

शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. विशेष म्हणजे. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने सोमय्या यांना सुरक्षितपणे गाडीत बसवलं आणि तिथून बाहेर काढलं. पण यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला.

See also  फी कपातीच्या निर्णयाविरोधात खासगी शाळांच्या संघटनांनी न्यायालयात जाण्याचा दिला राज्य सरकारला इशारा