पुणे :
औंध परिसरातील आयटीआय रस्त्यावर एका इमारतीत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली.
त्यानुसार पाेलीसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायातून परदेशी तरुणींसह एकूण सहाजणींची सुटका केली आहे. याप्रकरणी मॅनेजरसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यता आला आहे.
चतृश्रृंगी पाेलीस ठाण्यात याप्रकरणी स्पा सेंटरचा मॅनेजर सागर शाम पवार (वय-३२) याच्यासह अन्य दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पाेलीस अंमलदार स्नेहा संदीप धुरी यांनी पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये थायलंड, मिझाेराम, पुणे येथील तरुणींचा समावेश आहे.
औंध परिसरात औरा स्पा सेंटर असून त्याठिकाणी मॅनेजर सागर पवार व त्याचे इतर सहकारी वेश्याव्यवसायाकरिता महिलांना प्राप्त करुन घेत हाेते. त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करुन मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वत:ची उपजिविका भागवित हाेते. याबाबत चतुश्रृंगी पाेलीस पुढील तपास करत आहे.