सिंधुदुर्गमध्ये लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक : आदित्य ठाकरे

0

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्गमध्ये पर्यटनवाढीला वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक आहे आणि तसं होत आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आदित्य ठाकरे यांनी आज मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते.

मालवण नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले. यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, मत्स्यालयाचा प्रस्ताव असून अनेक हाॕटेलांचे देखील प्रस्ताव येत आहेत. लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही ८० वरुन १० वर आणली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे केवळ किल्ले नसून ती मंदिरे आहेत. पर्यटन आणि त्यांचे संवर्धन अशा दोन्हींबाबत काम सुरु आहे.

See also  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पन्नास वर्षानंतर अखेर विसर्जित