राजाभाऊ गुडदे फाऊंडेशनतर्फे ‘नव निर्माण’ उपक्रमाद्वारे भादलवाडी गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
slider_4552

भादलवाडी :

राजाभाऊ गुडदे यांच्या 72 व्या जयंती निमित्त राजाभाऊ गुडदे फाऊंडेशनतर्फे ‘नव निर्माण’ या उपक्रमाद्वारे भादलवाडी या गावात दिनांक 19 मार्चला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जि. प. प्राथमिक शाळेतील मुलामुलींसाठी प्रश्नमजुषा व आकर्षक बाक्षसांचे वाटप केले तसेच, नवयुवकांसाठी करिअर मार्गदर्शन करण्यात आले व ऑनलाईन मोबाईल फ्रॉड संबंधी गावकऱ्यांना माहिती देण्यात आली.

या संपूर्ण उपक्रमाची पायाभरणी करण्याचे काम
फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत व अध्यक्षा सौ. किरण संगीत गुडदे, सहकारी अभिषेक चौथमल व अनुष्का शुक्रे यांचे होते, या उपक्रमात राजाभाऊ गुडदे फाऊंडेशनचे सर्व सदस्य, मनोज जोशी तसेच नवयुवकांनी श्रमदान केले. यासर्वाना फाऊंडेशनतर्फ प्रमाणपत्र देण्यात आले.

उपक्रमात इंटेग्स क्लाऊड कंपनीचे सचिन साळुंखे,
हुजेफा कमरी, वैभव अंचरवाडकर व इतर कर्मचारी यांचे
मोलाचे सहकार्य लाभले. भादलवाडीचे सरपंच शिवाजी कर्नेरकर, तुकाराम शिंदे व तरुण गावकरी मंडळीनी देखील उत्साहाने सहकार्य केले.

See also  डेटिंग ॲपवरून महिलेशी मैत्री करणे एका तरुणाला पडले महागात : वाकड येथील घटना