बालेवाडी :
बालेवाडी येथील पहिल्या-वहिल्या नाविन्यपूर्ण महिलांसाठीच्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामन्यात YODDHA BW संघाने अमृता निकम च्या शतकी खेळी मुळे P10 VEERAS संघावर दणदणीत विजय मिळवत इंटर सोसायटी वुमन प्रिमियर लीगचे विजेते पद मिळविले. तर CZ WARRIEARS संघाने BALEWADI WOMENS CLUB संघावर विजय मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सरलाताई बाबुराव चांदेरे आणि अनुराधा ओक उपसंचालक शिक्षण विभाग यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना डॉ. सागर बालवडकर उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस, यांनी सांगितले की, महिला खेळाडूंनी दाखवलेला उत्साह पाहून या स्पर्धा यशस्वी झाल्याचे समाधान मिळते. या लीग च्या माध्यमातुन सोसायटी वर्गातील नागरिकांशी निर्माण झालेले ऋणानुबंध असेच वाढत राहतील. येणाऱ्या पुढील काळात सोसायटीतील लहान मुलांसाठी देखील लीग आयोजित करणार आहे. एसकेपी कला क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून या महोत्सवात सोसायटी अंतर्गत नाट्यस्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच विविध उपक्रमातून सर्वांशी नेहेमीच सवांद सुरू राहील.
तत्पूर्वी अतीशय चुरशीने खेळल्या गेलेल्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात YODDHA BW संघाने वेदिका दिवाण च्या खेळाच्या जोरावर CZ WARRIEARS संघाचा पराभव करत तर P10 VEERAS संघाने बकुल करंदिकरच्या खेळाच्या जोरावर BALEWADI WOMENS CLUB चा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
यावेळी श्री खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर, ॲड. तानाजी चोंधे, प्रा. रूपाली बालवडकर अध्यक्ष बालेवाडी वुमन्स क्लब, समीर चांदेरे, पुनम विधाते, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, महेंद्र बालवडकर, माणिक गांधीले, मनोज बालवडकर, शेखर सायकर, महादेव चाकणकर, शरद मांगडे, विक्रम बालवडकर आदि मान्यवर उपस्थित होते.