बालेवाडी :
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशन यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केले होते. परिसरातील १०० पेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ घेतला.
याचवेळी महिलांच्या मासिक पाळी संबंधित समस्या यावर डॉ.प्रिया देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. वृंदा थोरात यांनी त्वचा व केसांची काळजी बद्दल सांगितले.तर डॉ. चारूशिला पलवडे नाॅर्मल डिलिवरी विषयावर बोलल्या. डॉ.एड. वसुंधरा पाटील यांनी फेडरेशनची उद्दिष्टे सांगून हि एक अराजकीय चळवळ असल्याचे नमूद केले. प्रमुख पाहुणे डॉ.मिना विधुळे यांनी भारतीय संस्कृतीत महिलांना असलेल्या सन्मान बद्दल सांगितले. बालेवाडी वुमेन्स क्लब अध्यक्ष प्रा. रूपाली बालवडकर यांनी महिला सबलीकरणचे महत्त्व विशद केले. शुभांगी चपाटे यांनी उत्तम सुत्रसंचलन केले तर मृणाल कोल्हे यांनी आभार मानले.
वैभव आढाव, विकास कामत, एड. एस.ओ. माशाळकर, एड. परशुराम तारे, रश्मि भाटिया, मोरेश्वर बालवडकर, शकिल सलाटी, डी डी सिंग, अशोक नवाल,एड. इंद्रजित कुलकर्णी, रमेश रोकडे या फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी तर बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश देशपांडे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मदत केली.