थायलंड :
क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि सर्वकालीन महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. वॉर्नच्या व्यवस्थापकांनी एक संक्षिप्त विधान प्रसिद्ध केले आहे. ज्यात, ‘थायलंडमधील कोह सामुई येथे शेन वॉर्नचे निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आला.’ असे निवेदनात म्हटले आहे.
‘शेन वॉर्न अटॅक आल्याने घरामध्येच पडला होता. वैद्यकीय कर्मचारी आणि स्टाफने त्याच्यावर घरातच उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वॉर्नने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. वैद्यकीय कर्मचार्यांनी सर्वोत्तम प्रयत्न करुनही त्याला वाचवता आले नाही.’ असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वॉर्नच्या कसोटीत ७०८ विकेट
ऑस्ट्रेलियाच्या या महान गोलंदाजाने २००७ मध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १००० बळींचा टप्पा गाठणारा शेन वॉर्न हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. वॉर्नच्या नावावर कसोटीत ७०८ तर वनडेत २९३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.
शेन वॉर्नने आपल्या खेळाने जगाला जितके प्रभावित केले आहे तितकेच त्याच्या वादांमुळे क्रिकेट जगतात निराशा झाली आहे. १९९८ मध्ये बुकीला माहिती दिल्याबद्दल वॉर्नला दंड ठोठावण्यात आला होता आणि २००३ च्या विश्वचषकाच्या काही दिवस आधी बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्यावर क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती.
१९९६ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध वॉर्नने जोरदार गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.
आयपीएलमध्येही शेन वॉर्न यांनी महत्वपूर्ण कामगिरी कोली होती. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्न यांच्यावर सर्वात मोठी बोली लावली होती. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले.
Former Australian Cricketer Shane Warne dies of ‘suspected heart attack’, aged 52, says Fox Sports pic.twitter.com/cgocTvhLCC
— ANI (@ANI) March 4, 2022