राज्यात ३१ जानेवारी पर्यंत लॉकडाऊन !

0

मुंबई :

जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट परतावण्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे पूर्ण जगाची डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच आपल्या देशातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यामुळे खबरदारी घेतली जात आहे.

तर दुसरीकडे कोरोनाचे संकट महाराष्ट्रातही पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. यामुळेच ठाकरे सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील, असे जाहीर केले आहे.राज्य सरकारकडून आज सकाळीच ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लॉकडाउन वाढण्यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्द करण्यात आला.

राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरु होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट केलं आहे.

See also  परळी औष्णिक वीज केंद्राने प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा व ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला.