छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजीत कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली नियमावली जाहीर

0
slider_4552

मुंबई :

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तारखेनुसार येणाऱ्या जयंतीचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला आज मान्यता दिली. परंतु, शिवजयंती सोहळ्यास उपस्थित सर्वांनी सामाजिक अंतर, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेने जयंती आहे ,या पार्श्ववभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभू राजे देसाई यांनी शिवज्योत आणि शिवजन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी शिवदौडीचे आयोजन करण्यात येते या दौडीत जास्तीत जास्त दोनशे, तर शिवजन्मोत्सव सोहळ्याला जास्तीत जास्त पाचशे जणांना उपस्थित राहता येणार आहे. शिवजयंतीला उपस्थित सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. मार्च २०२० मध्ये महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता, त्यामुळे राज्यात अनेक विविध सण उत्सव साजरे करण्यावर बंधन घालण्यात आली होती. कोणताही नागरिक मोकळे पणाने सण उत्सव साजरे करू शकत नव्हता.

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्याने आता राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २०२१ च्या डिसेंबरमध्ये देशात आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली होती. मात्र कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा लोकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्याने आता यावर्षी अनेक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येणार आहेत.

See also  कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये, हा शेवटचा इशारा आहे : मुख्यमंत्री