लहू बालवडकर यांच्या वतीने एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिर संपन्न

0
slider_4552

बालेवाडी :

भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांच्या वतीने दिनांक १० फेब्रुवारी रोजी बालेवाडी येथील लहु बालवडकर जनसंपर्क कार्यालय येथे एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरासाठी डॉ. प्रविण बढे सर (M.D. PHD, नॅचरोपॅथी सायन्स) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

शिबिराची माहिती देताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, आपले आरोग्य ठीक असेल तर जीवन सुरळीत होते. परिसरातील नागरिकांचे आरोग्यविषयक काळजी घेताना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सल्ला आरोग्याची मोफत तपासणी साठी विशेष शिबिर आयोजित केले होते त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. देखील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यादृष्टीने वेगवेगळ्या प्रकारे शिबिर आयोजित करण्यात येतील.

या एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. तसेच या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा बाणेर-बालेवाडी येथील साडेचारशे पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमास ह. भ. प. दिलीप नाना बालवडकर, मा. कांतीलाल शेठ बालवडकर, मधुकर बालवडकर, गजानन बालवडकर, ज्ञानेश्वर बालवडकर, राजेंद्र मांगडे, शरद बालवडकर, सचिन गायकवाड, संतोष बालवडकर, किरण बालवडकर, तानाजी माने, बाळासाहेब काळे, रोहित चोरगे, अमोल गायकवाड, संध्या नितनवरे यांच्यासोबत परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

See also  दोन जीव वाचविणा-या मारुती बनकर यांना योगीराज पतसंस्थेची आर्थिक मदत...