बाणेर :
श्रीनाथ सोशल फाउंडेशन व नगरसेविका सौ.ज्योती गणेश कळमकर आयोजित स्मार्ट सोसायटी स्पर्धा या उपक्रमाची कार्यशाळा दिनांक 06/02/2022 रोजी हॉटेल सदानंद या ठिकाणी पार पडली. या कार्यशाळेत आपली सोसायटी कश्या प्रकारे सर्वगुणसंपन्न करावी याकरिता विविध विषयाचे मार्गदर्शन / प्रेझेंटेशन सादर करण्यात आले.
या उपक्रमाची माहिती देताना नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले की, स्मार्ट असणारे आपल्या प्रभागांमध्ये आपल्या परिसरातील सोसायट्या देखील अधिकाधिक स्मार्ट व्हाव्यात यादृष्टीने स्मार्ट सोसायटी स्पर्धा आयोजित केली आहे. आपला परिसर नैसर्गिक व पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक चांगला व्हावा यासाठी सर्व सोसायटी, रहिवासी वसाहत यांनी स्पर्धेकरिता ऑन लाईन व प्रत्येक्ष फॉर्म भरून सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या निमित्ताने परिसरातील सोसायट्या अतिशय स्मार्ट व्हाव्यात याकरिता ही विशेष कार्यशाळा आयोजित केली होती.
यावेळी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी भारतमातेचे पूजन केले. तसेच उपस्थित नागरिकांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. या स्पेर्धेत 150 हुन अधिक सोसायट्यांनी भाग घेतला असून स्पर्धेत सहभागी सर्व सोसायटी / अपार्टमेंट / वस्ती भाग यांना खालील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
रेनवाटर हार्वेस्टिंग
सॅनिटरी पॅड नॅपकिन डीस्पोजेबल मशीन
100 टक्के लसीकरण
टेरेस गार्डन
सांस्कृतिक उपक्रम
कचरा वर्गीकरण
सोसायटी साठी सोलर
ई वेस्ट संकलन
ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती
जुनी पुस्तके,कपडे,फर्निचर वाटप,
पर्यावरण उपक्रम
ज्येष्ठ / लहान मुलांसाठी उपक्रम
प्रदूषण नियंत्रण उपक्रम
आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राजेश पांडे, पूजा सगणे, डॉ. आशिष पोलकडे, गणेश मांजरे, भाग्यश्री साठे, रवी सुळे, लोकेश आर्य, पांडुरंग भुजबळ, अनिल गायकवाड, मधुकर दळवी, मनोज मेहता, दिपक मारणे, दीपक शोत्री, विजय वरुडकर या वक्त्यांचे सदर स्मार्ट सोसायटी स्पर्धा कार्यशाळेला मार्गदर्शन लाभले. यावेळी नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, युवा नेते लहू बालवडकर आणि विविध सोसायट्या मधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.