बाणेर :
शिवसेना प्रभाग क्रमांक 13 वतीने डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या माध्यमातून ॲड. लीना मुरकुटे यांच्या वतीने भारताची गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर व अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्याकरीता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माता रमाबाई यांच्या जयंती निमित्त परिसरातील महिलांना साडी वाटप ॲड. लीना मुरकुटे यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, भारताची गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले, त्यांच्या जाण्याने आपल्या देशाची फार मोठी हानी झाली. लता दीदींनी देशासाठी नेहमीच आपल्या आवाजाने प्रेम व्यक्त केले. अशी व्यक्ती परत होणे नाही. तसेच माता रमाबाई यांच्या जयंती आहे. त्यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाची साथ दिली. तसेच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली. पण त्या नसताना देखील त्यांच्या संस्थेला हवी तेवढी मदत करत राहील. महिलांसाठी काही वेगळे योगदान देण्यासाठी महिलांकरिता पथसंस्थेच्या माध्यमातून मदत करत आहे. शिवसैनिक म्हणुन महिलांसाठी काही काम करू शकतो याचा अभिमान आहे. यावेळी महिलांसाठी बाणेर नागरी महिला सहकारी पतसंस्था निर्माण करण्यात आली असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ दिलीप मुरकुटे, ॲड. लीना मुरकुटे, बाणेर नागरी सहकारी पतसंस्था पिरंगुट शाखा अध्यक्ष राम गायकवाड, शशिकांत दर्शने, मयूर भांडे, बाळासाहेब भांडे, ज्योती चांदेरे, संगीता पाटील, मकरंद कळमकर, सुनिल कळमकर, संतोष भोसले आणि महीला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम गायकवाड यांनी केले.