बावधन :
बावधन येथे आज १४/१/२०२२ रोजी मकरसंक्रांतीचे निमित्त साधून भाजपा युवा नेते मंदार घुले यांच्या वतीने लहान मुलांसाठी पतंग आणि तिळगुळ वाटप करण्यात आले. मंदार दादांनी पतंग दिल्याने लहान मुलांना फार आनंद झाला. मुलांनी मोठया उत्साहात पतंग घेतले आणि हवेत उडवले.
या पतंग आणि तिळगुळ वाटपाची माहिती देताना युवा नेते मंदार घुले यांनी सांगितले की, मकरसंक्रात आली की लहान मुलांना वेध लागतात ते पतंग उडविण्याचे. अशा वेळी त्यांना पतंग मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होतो. त्यांच्या चेहर्यावरील आनंद वाढवण्यासाठी त्यांना पतंग उपलब्ध करून दिली. पतंग घेताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला एक वेगळ समाधान लाभले. पतंग उडविताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी मुलांना देऊन पतंग उडविण्याचा आनंद घेण्याचे सांगितले.
यावेळी बावधन ग्रामपंचायत सदस्य कल्पना महेश घुले, निलिमा मंदार घुले, राजेश भारते, विशाल पाटील, हेमंत काका सोळगे, बलसाने काका, निखिल घुले, चेतन घुले, खालीद शेख, शैलेश घुले, मांतेष, शुभम चौधरी, आकाश लोखंडे, कुणाल मुंजकर , प्रितेश मुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.