प्रकाश बालवडकर यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

0
slider_4552

बालेवाडी :

भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर प्रभारी प्रकाश बालवडकर आणि भाजपा सदस्या मयूरी प्रणव बालवडकर यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याची माहिती देताना भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर प्रभारी प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनात दिनदर्शिकेचे महत्व लक्षात घेता परिसरातील नागरिकांना दिनदर्शिका उपलब्ध करून देत आहे. या दिनदर्शिकेमध्ये दररोज च्या जीवनात आवश्यक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत दिनदर्शिका पोहचविणार आहे.

प्रकाशन करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, प्रकाश बालवडकर हे नागरिकांचे हित लक्षात घेऊन समाज उपयोगी कामात अग्रेसर राहतात. अतिशय चांगल्या प्रकारची विविध माहिती असणारी दिनदर्शिका नागरिकांसाठी ऊपलब्ध करून देत आहे. सुनबाई मयुरी बालवडकर देखील समाज उपयोगी कामात सक्रिय सहभागी असतात.

या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, कोथरुड विधानसभा अध्यक्ष पुनित जोशी, जयंत भावे, समीर पाटील, प्रकाश बालवडकर, मयूरी बालवडकर, मारुती बालवडकर, भरत बारणे, रविंद्र जगदाळे आदी उपस्थित होते.

See also  किरीट सोमय्या करणार हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड.