डॉ. सागर बालवडकर यांच्यावतीने ‘एस के पी रोलिंग ट्रॉफी’ टी-१० इंटर सोसायटी क्रिकेट प्रिमिअर लीगचे आयोजन

0

बालेवाडी :

बालेवाडी येथे एसकेपी कॅम्पस मध्ये डॉ. सागर बालवडकर यांच्यावतीने ‘एस के पी रोलिंग ट्रॉफी’ टी-१० इंटर सोसायटी क्रिकेट प्रिमिअर लीग (T10 Inter Society Cricket Premier League) ही भव्य स्वरूपातील क्रिकेट स्पर्धा  आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे हे असणार आहे.

बालेवाडी परिसरातील सोसायट्यांमध्ये लोकप्रिय असणारी ही स्पर्धा २०१५ – १६ पासून दरवर्षी एस के पी रोलिंग ट्रॉफीज या नावाने खेळवली जाते. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी बालेवाडीतील जवळपास ५० – ६० रहिवाशी सोसायटीमधील तरुणांना एस के पी रोलिंग ट्रॉफी या क्रिकेटच्या या भव्य स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामधून २४ टीम तयार करण्यात आल्या आहेत. एस के पी रोलिंग ट्रॉफी ही मानाची ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस असते.

या क्रिकेट स्पर्धे बद्दल माहिती देताना स्पर्धेचे आयोजक डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की, क्रिकेट म्हटलं की लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा खेळ. हा खेळ मनाला आनंद तर देतोच, त्याबरोबर सर्वांना एकत्रित करण्याचे काम देखील करत असतो. म्हणूनच विविध सोसायट्यांमधील तरुणांना खेळण्यासाठी एक संधी निर्माण करण्याच्या हेतूने ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत वडील आणि मुलगा दोघेही एकत्रित खेळण्याचा अनोखा अनुभव पाहायला मिळतो. कुटुंबातील सदस्याला सहभागी होताना  पाहण्याचा आनंद मिळतो. २०१५ – १६ पासून मोठ्या उत्साहात सोसायट्यांमधील नागरिक या स्पर्धेत सहभागी होतात. खेळाचा आनंद लुटतात. भव्य स्वरूपात होणाऱ्या स्पर्धेचे यु ट्यूब वरती लाइव्ह प्रक्षेपण देखील होणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, ट्रॅकपॅन्ट आणि कॅप दिली जाणार आहे. कारोना चे चे सर्व नियम पाळून ही स्पर्धा होणार आहे.

See also  पाषाण येथे अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) जनजागृती मोहीम !

सदर स्पर्धा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवार या दिवशी खेळविली जाणार आहे.

या स्पर्धेला दिले जाणारे बक्षिसे पुढीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक  – रोख रक्कम २१००० रू आणि मानाची एस के पी रोलिंग ट्रॉफी
द्वितीय क्रमांक – रोख रक्कम १५००० रू आणि भव्य ट्रॉफी
तृतीय क्रमांक – रोख रक्कम ११००० रू आणि भव्य ट्रॉफी

मॅन ऑफ द मॅच
मॅन ऑफ द सिरीज
बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज
बेस्ट बॅटर ऑफ द सिरीज