म्हाळुंगे :
म्हाळुंगे गावातील सर्व महिला माता-भगिनिंकरीता नगरसेवक अमोल बालवडकर व आशाताई रतन बालवडकर यांच्या वतीने मोफत कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन व ज्योतिबा दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील सुमारे १५० माता-भगिनिंनी या यात्रेमध्ये सहभागी होवुन दर्शन यात्रेचा लाभ घेतला.
याबद्दलची माहिती देताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, बऱ्याच काळापासून परिसरातील माता-भगिनींना देवदर्शन जाता आले नव्हते. या सर्व माता भगिनींना देवाच्या दर्शनासाठी पाठवण्याची इच्छा होती. आपल्या भागातील भरपूर महिला या सांप्रदायिक असून देवाची भक्ती करणाऱ्या आहेत. या भक्तांना देव दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणूनच देव दर्शन यात्रेचे आयोजन केले गेले होते. महिलांनी देखील समाधान व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, प्रकाश बालवडकर (प्रभारी सहकार आघाडी पुणे), आशा रतन बालवडकर, मा.सरपंच म्हाळुंगे गाव काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे व परिसरातील महिला व नागरीक उपस्थित होते.