भारतीय जनता पार्टी तर्फे देशभर ‘ दिव्य काशी , भव्य काशी ‘ या उपक्रमाचे आयोजन

0

पुणे :

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी च्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. वाराणसी तथा काशी येथील विकास प्रकल्पांचे ( वाराणसी कॉरिडॉर ) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी तर्फे देशभर ‘ दिव्य काशी , भव्य काशी ‘ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. ‘ दिव्य काशी-भव्य काशी’ या कार्यक्रमाचे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख मंदिरांमध्ये भव्य पडद्यावरून थेट प्रक्षेपण सकाळी ११.०० पासून केले जाणार आहे.

सकाळी ९.३० पासून विविध मंदिरांमध्ये पूजा, अभिषेक, आरती, प्रसाद वाटप आयोजित केला असून पुणे शहर भाजपाने, शिव मंदिर – विश्रांतवाडी चौक, केदारनाथ मंदिर – शिवाजीनगर, काशी विश्वेश्वर मंदिर दत्तनगर, घोरपडे उद्यान शिवमंदिर, मांजराई मंदिर -मांजरी, नागेश्वर मंदिर – सोमवार पेठ, विकास मित्र मंडळ गणेश मंदिर – कर्वेनगर, गजानन महाराज मठ – सातारा रस्ता या प्रमुख मंदिरांसह शहरात विविध ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मांजराई मंदिर -मांजरी येथे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, शिव मंदिर – विश्रांतवाडी चौक येथे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित रहाणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातील कार्यक्रम स्थळी आमदार आणि सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात त्या त्या भागातील धर्माचार्य, साधू संत, विद्वान-विचारवंत सहभागी होणार असून यावेळी त्यांचा गौरव केला जाईल.

See also  पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा घेतला निर्णय