सुस-म्हाळुंगे गावात विविध विकासकामांचे भुमिपुजन संपन्न..!

0

सुस – म्हाळुंगे :

पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ सुस व म्हाळुंगे गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध विकासकामांचा भुमिपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी या गावांमधील अत्यंत महत्वाचा पाणी प्रश्न सोडविण्याकरीता ठिक-ठिकाणी टाक्या बसवणे व टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करणे या सहित विविध ठिकाणी रस्ते व ड्रेनेज लाईन विकसित करणे या कामांचे देखिल भुमिपुजन करण्यात आले.

यावेळी “आगामी काळात बाणेर-बालेवाडी प्रमाणेच सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावांचा नियोजनबद्ध विकास करुन निश्चितच कायापालट केला जाईल व तसेच भविष्यात या गावांचा पाणी प्रश्न कायमचा मिटविण्याकरीता आगामी काळात पुणे मनपा च्या सहकार्याने दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी १ कोटी लिटरच्या टाक्या उभारण्यात येतील” असे आश्वासन नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ग्रामस्थांना दिले.

नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी पीएमआरडीच्या माध्यमातून नियोजन बद्ध विकास करण्यात येईल तसेच पाणीपुरवठा कायमस्वरुपी सुटेल याकडे लक्ष दिले जाईल.

नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांनी नागरिकांच्या पाणी रस्ते लाईट या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल असे सांगितले.

सदर प्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती गणेश कळमकर, स्वप्नाली सायकर, सुसगाव उपसरपंच दिशाताई ससार, उमाताई गाडगीळ, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहु बालवडकर, अनिल ससार, काळुराम गायकवाड, नितिन रनवरे, मंदार राराविकर, शरद भोते, नारायण चांदेरे, दशरथ मामा चांदेरे, चांगदेव कोळेकर, राजेंद्र पाडाळे, लक्ष्मण ओझरकर, सदाशिव मोरे, तुषार हगवणे, अजय पाडाळे, ह. भ. प. लक्ष्मण हगवणे, ईश्वर चोरघे, राकेश ज्योतीबा पाडाळे, संदीप बांदल, मारुती मरकड, संजय ससार, संतोष चांदेरे, योगेश पाडोळे, अनिकेत ससार, विशाल कुंभार, स्वप्नील ओझरकर, सुभाष उमाप, अमृता चांदेरे, चंदेल काका, आदित्य काळभोर, साहिल ससार, अभिषेक ससार, सिद्धांत ससार, आकाश ससार, अमित चांदेरे व प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगेमधील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

See also  सुस रोड परिसरातील दुकानांना अचानक आग गॅरेज चालकाचे मोठे नुकसान..!