बावधन :
बावधन बुद्रुक येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ बावधन व भुंडे परिवार यांच्या वतीने कुलदैवत श्री खंडोबा देवस्थान मंदिर “चंपाषष्टी उत्सव” कार्यक्रम घेण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची माहिती देताना श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सूर्यकांत भुंडे (ग्रामपंचायत सदस्य) यांनी सर्व विश्वस्तांच्या वतीने सांगितले की, कुलदैवत श्री खंडोबा देवस्थान मंदिर चंपाषष्ठी उत्सव दिनांक पाच डिसेंबरपासून अतिशय उत्साहात साजरा झाला आहे. रोज सकाळी समस्त ग्रामस्थ मंडळ बावधन यांच्या वतीने काकडा होत आहे. या उत्सवाची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुवार दिनांक ९ रोजी होणार आहे. भाविकांसाठी ह. भ. प. गणेश महाराज कार्ले यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
तसेच सर्व येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन देखील केले गेले आहे. यावेळी देवाचा जागरण गोंधळ होणार असून परिसरातील सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित राहून या भक्तीमय कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले.
कार्यक्रमाची रूपरेषा :
गुरुवार दि.९/१२/२०११ रोजी
सायं. ७ ते ९ किर्तन ह.भ.प. गणेश महाराज कार्ले
(पुणे) यांचे सुश्राव्य किर्तन
रात्री ९ नंतर
महाप्रसाद
रात्री १०.३० नंतर जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी (विलास माळवे यांचे जागरण गोंधळ)
* आपले नम्र*
* श्री खंडोबा देवसेवा ट्रस्ट, भुंडे वस्ती, बावधन बुद्रुक
* समस्त ग्रामस्थ बावधन आणि समस्त भुंडे परिवार
* स्थळ : श्री खंडोबा मंदिर, भुंडे वस्ती, बावधन बु. पुणे-२१.