बाणेर :-
बाणेर येथे आयोजित करण्यात येत असलेल्या गिरीधर कट्ट्यावर आज बाणेर बालेवाडी औंध पाषाण परिसरातील रहिवासी सोसायटी धारक नागरिकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी परिसरातील समस्या व त्यावरील उपाय योजना यावर सर्वांनी एकत्र मिळून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध परिसरातील रहिवाशी सोसायट्यांमधून महानगरपालिकेस मोठ्या प्रमाणात टॅक्स रूपाने निधी उपलब्ध होत, असताना देखील या सोसायटी धारकांच्या मूलभूत गरजा देखील महानगरपालिकेतर्फे सोडवल्या जात नसल्यामुळे सोसायटी धारकांनी महानगरपालिकेवर नाराजी व्यक्त केली. पाणी, रस्ते ,कचरा अशा विविध समस्या ना सोसायटी धारक नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी बाणेर बालेवाडी सारख्या परिसरामधील सोसायट्यांना टँकर चा सहारा घ्यावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेस टॅक्स भरून देखील या सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
क्षेत्रीय कार्यालयामध्ये होणाऱ्या मोहल्ला कमिटी मीटिंग क्षेत्रीय कार्यालयात न होता स्थानिक परिसरामध्ये जाऊन या बैठका आयोजित केल्या जाव्या अशी मागणी एक मुखाने सर्वांनी केली. तसेच पुढील काळामध्ये परिसरातील सर्व सोसायटी धारकांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध रीतीने आपल्या मागण्या महानगरपालिकेसमोर मांडाव्यात व त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे या बैठकीमध्ये ठरले.
यावेळी बोलताना विकास कामत म्हणाले की, कम्फर्ट झोन सोसायटी व त्यालगत असलेल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याची समस्या जाणवते. सोसायटी समोरील रस्ता अद्यापही अपूर्ण आहे. रस्त्यावर आठवडे बाजार भरवले जाता असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
बाणेर पाषाण लिंक रोड चे राजेंद्र चत्तुर म्हणाले की, बाणेर पाषाण लिंक रोडवरील वर्षानुवर्ष अपूर्ण असलेला रस्ता कधी पूर्ण होणार याचे कोणाकडेच उत्तर नाही. लिंक रोड वरती ही सोसायट्यांमध्ये पाणी समस्या आहे. तसेच गिरीधर कट्टा चांगला उपक्रम पत्रकारांनी सुरू केला आहे. चर्चा व संवादातून अनेक प्रश्न सुटतात तसेच या कट्ट्यावरून अनेक विषय सुटण्यास मदत व्हावी अशी सदिच्छा यावेळी चत्तुर यांनी दिली.
यावेळी गिरीधर कट्ट्याला बालेवाडी रेसिडेंशल वेल्फेअर असोसिएशन चे रमेश रोकडे, कम्फर्ट झोन सोसायटीचे चेअरमन विकास कामत, सिध्दप्पा मासाळकर, एडवोकेट तारे, मोरेश्वर बालवडकर, राहुल कोकाटे, मोहल्ला कमिटीच्या अध्यक्षा वैशाली पाटकर, जीवन चाकणकर, अनिकेत मुरकुटे, डी. डी. सिंग तसेच बाणेर पाषाण लिंक रोड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चत्तूर, रविंद्र सिन्हा, मेडोज हॅबिटेड सोसायटीचे सचिव गणेश तिखे, आदि उपस्थित होते.