पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवणुकिसाठी अजित पवार यांचा अर्ज दाखल

0

पुणे :

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानूसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा आज ‘अ’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

‘अ’ वर्ग मतदारसंघातून बारामती तालुका प्रतिनिधीकरीता अजित पवार यांच्या वतीने दोन अर्ज दाखल केले आहेत. याआधी नुकतेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यानंतर आता अजित पवार यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे, अनुमोदक म्हणून दिपक मलगुंडे दुस-या उमेदवारी अर्जावर अमोल गावडे यांनी सूचक तर लालासाहेब नलवडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलीय.

दरम्यान, 1991 पासून अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवडून गेलेले आहेत. या मतदारसंघात 195 मतदार आहेत.तर, बँकेवर संचालकपदी संधी देण्याबाबत पवार हेच निर्णय घेणार आहेत.खरंतर अजित पवार यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व आहे.त्यामुळे बँकेवर कोणता सदस्य निवडायचा हा अधिकार त्यांच्याकडेच असणार आहे.सुरुवातीच्या काळात या बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनीच संभाळली आहे. तसेच ते 7 वेळा चेअरमन पदावरही होते.

See also  कोरेगाव भीमा प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : गृहमंत्री