भारतातील १२ शक्ती पिठांच्या दर्शनाचा लाभ घेतला हजारो भाविकांनी
बालेवाडी : लहू बालवडकर सोशल वेलफेअर ने आयोजित केलेल्या भारतातील १२ शक्तिपीठांच्या पादुका दर्शनाचा अभूतपुर्व सोहळा बालेवाडी परिसरातील गेनबा सोपानराव मोझे कॉलेजच्या मैदानात मोठया उत्साहात पार पडला. भाविकांना दर्शन घेण्याची संधी मोठया प्रमाणात घेतली. दिवसभर भाविकांनी रांगा लावल्या व आवर्जुन महाप्रसादाचा लाभ घेतला. नागरीकांना 12 शक्ती पीठाचा एकत्रीत रीत्या लाभ घेता आला.परिसरातील नागरिकांना लहू बालवडकर यांच्या मुळे दर्शनाचा योग घेता आला त्यामुळें समाधान व्यक्त केले. १६ ते १७ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला व जवळपास १२००० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अवघा बालेवाडी परीसर भक्तिमय वातावरणात धुमधुमुन गेला.
यावेळी खास आवर्जुन उपस्थित असलेल्या कालीचरण महाराजांनी लहू बालवडकर यांनी घेतलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, आपली संस्कृती टिकविण्यासाठी असे कार्यक्रम घेतलेच पाहिजे. असे पुण्य कमविण्याचे काम लहू बालवडकर यांनी केले. अतिशय भव्य स्वरूपात हा भक्तिमय मेळा संपन्न केला आहे.
यावेळी उपस्थित भाविकांचे आभार व्यक्त करताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, भाविकांनी मोठया प्रमाणात दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. तसेच कालीचरण महाराजांनी मौल्यवान आशीर्वाद दिले व धर्माचे महत्व विशद केले. असा भक्तांचा मेळावा दरवर्षी आयोजित करून भक्तांची सेवा करू.
यावेळी कालीचरण महाराजांच्या हस्ते सायंकाळची महाआरती करण्यात आली. यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे धनंजय भाई देसाई, विश्व हिंदू परिषदेचे दादाजी वेदक, आमदार लक्ष्मण जगताप, राजेश पांडे, महंत पुरुषोत्तम पाटील, पुनीत जोशी, सोमनाथ पाडळे, शेखर जांभुळकर महाराज, ईश्वरबापू महाराज, पप्पू चांदेरे यांच्यासह पदाधिकारी, भाविक मिञपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.