औषध क्षेत्रात भारताचाच डंका : नरेन्द्र मोदी

0

नवी दिल्ली :

वर्षभरात भारताने जवळपास शंभर देशांना कोरोना लसीच्या 6.5 कोटींपेक्षा जास्त मात्रा निर्यात केल्या आहेत. येत्या काळात जसजशी आपली उत्पादन क्षमता वाढेल, त्यासंदर्भात आपण आणखी मोठे उद्दिष्ट गाठू शकणार आहोत.

भारतीय आरोग्य क्षेत्रावरील जगाने दाखवलेल्या विश्वासामुळे आज औषध क्षेत्रात भारताचाच डंका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी औषध क्षेत्रातील पहिल्या जागतिक शिखर संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मोदींनी, भारताने गेल्या वर्षभरात औषध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा दाखला देत जगासमोर आपण आदर्श निर्माण केल्याचे म्हटले. उद्योगाच्या मागणीनुसार नियामकांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या साच्यात बदल करण्यासाठीच्या मुद्यावर आम्ही नक्कीच संवेदनशील आहोत. त्यादृष्टीने सकारात्मकरीत्या काम केले जात आहे. आरोग्य क्षेत्रात मजबुती येण्यासाठी औषधे आणि लसींसाठीचा कच्चा माल देशातच निर्माण करण्याचे कार्य वेगाने केले पाहिजे.

सर्व जागतिक कंपन्यांना माझे आवाहन आहे की, भारतात येऊन काम करावे आणि संशोधन करावे. त्यासाठी सर्व सहकार्य भारत सरकार करेल, असेही पंतप्रधानांनी आश्वस्त केले. 12 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक भारताने 2014 नंतर आरोग्य सेवा क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीतील 12 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठले आहे. भारताला चिकित्सा उपकरणे आणि औषधांच्या संशोधनामध्ये अव्वल स्थान मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचे आहे, असेही मोदी म्हणाले.

घोटाळेबाजांना परत आणणार
बँकेचे कर्ज घेऊन कुणी पळाल्यास त्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होते. पण, जेव्हा एखादे धाडसी सरकार पैसे परत आणते त्यावर कुणीही चर्चा करीत नाही. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपये अडकून होते. त्यापैकी पाच लाख कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे. आर्थिक घोटाळे करून विदेशात फरार झालेल्यांना परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सरकार करीत आहे. लवकरच सरकारला यात यश येईल. पण, कोणताही पर्याय नसल्याने घोटाळेबाजांनी देशात परत यावे, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी ‘सिनर्जी फॉर सिमलेस क्रेडिट फ्लो अ‍ॅण्ड इकॉनॉमिक ग्रोथ’ या परिसंवादात दिला.

See also  कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा सरकारचा प्रस्तावही शेतकरी संघटनांनी फेटाळला.