अहमदाबाद :-
आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ च्या हंगामात आयपीएलचे एकूण दहा संघ असतील. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. २०२१मध्ये ‘आयपीएल’चे संघ वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २०२२पासून १० संघांचे ‘आयपीएल’ असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे.
BCCI general body approves 10-team IPL from 2022 edition at its AGM in Ahmedabad
— Press Trust of India (@PTI_News) December 24, 2020