पद्म पुरस्कारासारखा महत्त्वाचा आणि गौरवशाली पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण लायक नाहीत : आनंद महिंद्रा

0

मुंबई :

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनेकविविध क्षेत्रात कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये सामाजिक कार्य, उद्योग क्षेत्रातील योगदान, पर्यावरण आदी क्षेत्रातील कार्याकरिता पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

महिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर पद्म पुरस्कारासारखा महत्त्वाचा आणि गौरवशाली पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण लायक नाहीत, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.

‘या सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये बदल घडवून आणला आहे’, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. तसेच प्रामुख्याने तळागाळातील समाजाच्या सुधारणेत मुलभूत योगदान देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

मला त्यांच्या श्रेणीत सामील होण्यासारखे खरंच पात्र असल्यासारखं वाटले नाही, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. यावेळी केंद्र सरकाने उच्च पदस्थ व्यक्तींबरोबरच सामाजित कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वांना गौरवान्वित केलं आहे.

यावेळी महाराष्ट्रातुन बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांनी यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे. राहिबाई पोपेरे यांनी अनेक बियाणे जतन केली आहेत तर सिंधूताई सपकाळ यांनी अनेक अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.

त्याचबरोबर रजनीकांत श्राॅफ यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे तर दहा मान्यवरांना पद्मभुषण पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच 102 जणांना पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आले आहे.

बीजमाता राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे परंतु, सरकारने माझ्या गावातील पाणी आणि रस्ते या समस्यांकडे लक्ष द्यावं, अशी मागणी राहिबाई पोपेरे यांनी केली आहे.

यावेळी कर्नाटक राज्यातील पर्यावरणवादी तुलसी गौडा यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी तीस हजाराहुन अधिक रोपे लावली आहेत.विशेष बाब म्हणजे तुलसी गौडा यांनी लावलेल्या रोपातील एकही झाड आतापर्यंत वाया गेलेलं नाही. त्या अत्यंत साध्या वेषात पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या होत्या.

See also  गावातील कामे जलद गतीने मार्गी लावण्यासाठी, दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन !

आनंद महिंद्रा यांनी तुलसी गौडा यांचा पुरस्कार स्वीकारतानाचा एक फोटो ट्विटर वरून शेअर केला आहे. तुलसी गौडा त्यांचा दिवसभरातील वेळ हा झाडांची निगा राखण्यासाठी घालवतात.

दरम्यान, या काही वर्षांमध्ये नामांकित किंवा उच्च पदस्थ व्यक्तींशिवाय भूमीशी संबंधित असणाऱ्या अत्यंत सामान्य लोकांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.