प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात.

0

दिल्ली :

मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांची चळवळ अजूनच आक्रमक होताना दिसत आहे. हे कायदे मागे घ्यावे या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, सरकार मात्र त्यात बदल करू इच्छित आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन अधिकच आक्रमक आणि विस्तृत होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसही आक्रमक झाली आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांच्या काही बैठकाही झाल्या मात्र तरीही त्यातून अद्याप काही तोडगा बाहेर आलेला नाही. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना कृषी कायद्यांना विरोध म्हणून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं.

‘नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’ अशा प्रकारच्या घोषणा देत एका बाजूला प्रियांका या आंदोलन करत होत्या या आंदोलनाला पांगवण्यासाठी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांना फरफटत नेल आहे. दरम्यान पोलिस आणि आंदोलकांची बाचाबाची झाली. नंतर काही कार्यकर्त्यांना ओढत-फरफटत नेत पोलिस व्हॅनमध्ये नेऊन टाकल आहे.

वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलं. दरम्यान आता वातावरण अधिकच चिघळले असून पोलिसांनी आंदोलन परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तर त्यांचे बंधु काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी हे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे निघाले आहेत. या भेटीत ते कृषी कायद्यावर भाष्य करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदनही राष्ट्रपतींना देणार आहेत.

See also  ‘जनतेसाठी पदपथ’ स्पर्धेतील विजेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरांचा समावेश