काळ्या अंधारातून दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशाकडे जाणारा “सुर संध्या” एक चांगला कार्यक्रम : मुरलीधर मोहोळ

0
slider_4552

बाणेर :

दिवाळीचे निमित्त साधून लहू बालवडकर सोशल वेलफेअर च्या वतीने सुस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी सुर संध्या हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात दिलीप परब आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी कोरोना काळात पुणे शहरात विद्यापीठ विभागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा गौरव पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी दीपावलीच्या शुभेच्छा देताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, मागील दीड वर्षात कोरणा चा काळा प्रवास, काळ्या अंधारातून दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशाकडे जाणारा हा एक चांगला कार्यक्रम लहू बालवडकर यांनी राबवला. कोरोणा काळातदेखील सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम लहू बालवडकर यांनी केले. प्रभागातील प्रत्येक नागरिक लॉकडाऊन मध्ये जगला पाहिजे उपाशी राहू नये यासाठी चे प्रयत्न त्यांनी केले. कोरोनातून बाहेर पडताना सुर संध्या सारखा चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला. कोरोनाचा चा काळ संपत चालला असला तरी आपण सर्वांनी काळजी घेऊ.

यावेळी बोलताना पुणे महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे म्हणाले की, कोरोना काळात सर्वसामान्यांना मदत करत सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम लहू बालवडकर यांनी केले. असेच काम नेहमी करत राहो, त्यांनी केलेल्या प्रत्येकचांगल्या कामासाठी पाठबळ देण्याचे काम आम्ही करू, पुढील वाटचाली साठी लहू बालवडकर यांना खूप खूप शुभेच्छा, तसेच दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा!

कार्यक्रमाचे आयोजक लहू बालवडकर यांनी उपस्थित राहिलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार यावेळी व्यक्त केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, रा. स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, आणि प्रभाग क्रमांक ९ चे भाजप नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या सुर संध्या या कार्यक्रमामध्ये अनेक रसिक नागरिकांनी चांगली साथ दिली. शास्त्रीय संगीताचा लाभ नागरिकांनी घेतला. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांचा शास्त्रीय, सुगम व भावगीतांची सायंकालीन मैफल रसिकांनी उस्फूर्तपणे फुलवली. यावेळी अलबेला सजन आयो रे, अभंग, राजा पंढरीचा, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, बगळ्यांची माळ फुले आदी गाण्यांवर रसिकांना खिळवून ठेवणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

See also  राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान