प्रशांत जगताप हे पुण्याची राजकीय संस्कृती बिघडवत आहे : महापौर मुरलीधर मोहोळ

0
slider_4552

पुणे:

तीन दिवसापापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एक कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमात गुंडाचा प्रवेश भाजपने केला आहे.असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशात जगताप यांनी केला होता.चंद्रकांतदादा पाटील पुण्याची संस्कृती बिघडवत असल्याचे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले होते.त्यावर काल भाजपचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी काल राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपाच्या नेत्यावर संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप करणे, हा या शतकातील महान विनोद आहे.

कोरोनामुळे मानसिक ताण अनेकांवर आलेला आहे, परंतु तो जगताप यांच्यावर अधिकच आलेला दिसतो, अशा शब्दात प्रशांत जगताप याचा समाचार घेतला होता.त्यावर आज प्रशांत जगताप यांनी भाजपच्या पुणे शहरातील गुन्हेगारीचा २रा अंक आज प्रकाशीत केला त्यावर आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशांत जगताप हे पुण्याची राजकीय संस्कृती बिघडवत आहे अशी टिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशांत जगताप याच्या वर पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला सभागृह नेते गणेश बीडकर , उपमहापौर सुनीता वाडेकर,उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले,प्रशांत जगताप यांनी रोज काहीतरी नवीन बोलायची सवय लागली आहे.
प्रशांत जगताप याच्या मुळे राष्ट्रवादीची महानगरपालिकेमधील सत्ता गेली अशी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसन्न जगताप यांच्यावर केली.
प्रशांत जगताप यांनी त्यांच्या वॉर्डात किती कामे केली हे त्यांनी दाखवून द्यावे. आदरणीय दादा
कोथरूड मध्ये प्रत्येक नागरिकासाठी 24तास झटत आहेत. प्रशांत जगताप यांनी टीका न करता आपल्या वॉर्डात काम करावे. असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

See also  पुणे शहरात आता तिसरे रेल्वे स्टेशन सूरू करण्याचा मध्ये रेल्वेचा निर्णय