बालेवाडी :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना योग्य आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळावे या हेतूने लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या सयुक्त विधमाने आज बालेवाडी येथील रॉयल रनभूमी मल्टीस्पोर्ट्स टर्फ येथे IAS अधिकारी योगेश पाटील यांच्या एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला 300 हुन अधिक तरुण व त्यांचे पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक लहू बालवडकर सोशल वेल्फेअरचे अध्यक्ष लहू बालवडकर यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, युवकांच्या भविष्याचा वेध घेताना युवकांसाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन शिबिर पुढील काळातही राबवले जातील. जास्तीत जास्त युवकांनी स्पर्धे परीक्षेला सामोरे राहून उच्च पदावर कार्यरत रहावे अशी अपेक्षा आहे. शिवाय युवकांना या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भात भेडसावणाऱ्या अडचणी करिता त्यांनी आम्हाला संपर्क साधावा असे आव्हान करतो आहे. युवकांना हवी ती मदत आम्ही करू असे आश्वासन देत आहे.
स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारे सहभागी व्हावे, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करावा याचे अचूक आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. “IAS योगेश पाटील जी यांनी केलेले मार्गदर्शन आमच्या सारख्या उपस्थित मुलामुलींना भावी आयुष्यासाठी नक्कीच फायद्याचे आणि दिशादर्शक ठरेल यात शंका नाही” अशी भावना या वेळी उपस्थित काही तरुणांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या वेळेस सतीश पाटील(DY.CEO), लहु बालवडकर सोशल वेलफेअर चे सर्व पदाधिकारी दिनेश साहेबराव बालवडकर, सचिन दळवी, मनोज बालवडकर, किरण बालवडकर, संदिप तापकिर, विनोद बालवडकर, शाम बालवडकर, राहुल केदारी, दिगाबंर पिपंळे, श्रीकांत नायकुडे, किरण खंडागळे, अक्षय काळे, पवन जोध, अभिजीत भाबुरे उपस्थित होते.