स्वच्छतादूत आणि उद्योजक महिलांचा सन्मान : राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ आणि बालेवाडी वूमन्स क्लबचा उपक्रम

0
slider_4552

बालेवाडी :

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रभाग क्रमांक ९ आणि बालेवाडी वूमन्स क्लब यांच्या वतीने डॉ सागर बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री अनोख्या पद्धतीने साजरी करत आहे. पहिल्या दोन दिवसांप्रमाणे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी देखील डॉ. सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस ‘नऊ दिवस नऊ नारीशक्ती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

तिसरा दिवशी मेहनतीचे प्रतिक असलेल्या तपकिरी रंगाचा सन्मान तिसरा, स्वच्छतादूत असलेल्या आपल्या भगिनींचा ‘स्वच्छता तेथे प्रभुता’ असे आपण मानतो. रस्त्यावर, मैदानावर कचरा आपल्यातीलच काही लोक टाकतात. कचरा करणाऱ्यांना आपण ‘कचरेवाला’ न म्हणता तो साफ करणाऱ्यांना आपण ‘कचरेवाला’ म्हणतो. जिथे आपण नाक धरून पुढे जातात तिथे आपलेच काही बांधव दिवसभर कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावत असतात. आपल्या आरोग्याची पर्वा न करता सतत कचरा-दुर्गंधी यांच्या संपर्कात राहून ‘कचरेवाला’ अशी समाजाची दूषण खात समाज स्वच्छ राखण्याचे आपल्या बांधव आणि भगिनींचे योगदान अमुल्य आहे. आपला परिसर आपले शहर स्वच्छ राखणाऱ्या या स्वच्छतादूत सखींना सलाम ! नारी शक्तीला सलाम ! त्यांचा सन्मान तीसऱ्या दिवशी करण्यात आला.

दिवस चौथा, वीरतेचे प्रतिक असलेल्या केशरी रंगाचा !
सन्मान चौथा, हरहुन्नरी उद्योजक सखींचा ! आपल्या आजूबाजूला पण कित्येक महिलांनी छोटे मोठे नाविन्यपूर्ण उद्योग किंवा ज्याला START-UP म्हणतो ते सुरु केले आहेत. हातात फारसे भांडवल नसताना सुरु केलेले हे छोटे उद्योग, त्यांची कल्पक रचना आणि उत्पादने, मोठ्या उद्योगांच्या स्पर्धेला निडरपणे तोंड देण्याची जिद्द, दर्जा आणि व्यवहारातील सचोटी सांभाळण्याची धडपड ह्या साऱ्याच गोष्टी पहिल्या की त्यांना दाद दिल्या शिवाय राहवत नाही. अशा छोटे-मोठे व्यवसाय किंवा START-UP यशस्वीपणे चालवणाऱ्या उद्योजक सखींचा सन्मान चौथ्या दिवशी करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सत्कार करण्यात आलेल्या महिला भगिनी बद्दल बोलताना प्रा. रूपाली बालवडकर यांनी सांगितले की, साफसफाई करणाऱ्या आपल्या भगिनी यांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. त्यांना आपण कचरे वाले न म्हणता स्वच्छता दूत असे संबोधले पाहिजे. चौथ्या दिवशी सन्मान करण्यात आलेल्या आपल्या परिसरातील उद्योजिका म्हणजे आपला अभिमान आहे. त्यांची प्रगती दिवसेंदिवस वाढत राहो व त्यांच्या कष्टाचे जिद्दीची फळ त्यांना मिळावे अशी सदिच्छा नवरात्रीच्या निमित्ताने आपण करू.

See also  योगभवन सुसरोड, पाषाण येथे सुरु होणार लसीकरण केंद्र.

प्रा. रुपाली बालवडकर, मीना विधाळे, प्राची सिध्दीकी, राखी श्रीवास्तव, मानसी पाटील आणि मित वीज यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.