पीएमपीएमएल ची ओला – उबर कॅब कंपन्याना टक्कर

0

पुणे :

पुणे महानगर परिवहन सेवा ( पीएमपीएमएल ) आता ओला आणि उबर या दोन कॅब कंपन्याना टक्कर देण्यासाठी पुणे ई-कॅब सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना ठराविक अंतरासाठी कॅबसेवा देण्याच्या तयारीत पीएमपीएमएल आहे. तसेच अस बोलल जात आहे की , येत्या काही दिवसात १०० ते २०० ई-कॅब पीएमपीएमएलमध्ये सामिल होणार आहे.

विशेष म्हणजे यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच प्रवाशांना स्वस्तात सेवा देता येणार आहे.कॅब क्षेत्रामध्ये परिवहन विभाग उतरणार असल्याने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

याचा मार्ग सध्या तरी ठराविक स्वरूपाचा असणार आहे. पुण्यातील प्रदुषण कमी करून सार्वजनिक परिवहन सेवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार आणि तो नेमका कधी कार्यान्वित होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

See also  आरपीआय ला पुण्यात महापौर पद मिळाले पाहिजे : रामदास आठवले