पुणे :
रिसायकोल या पुणे महानगरपालिका, के. के. नाग प्रायव्हेट लिमिटेड आणि स्वच्छ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने थर्मोकोल रिसायकलिंग उपक्रमाचे उद्घाटन पार पडले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मागील पाच महिने प्रायोगिक तत्त्वावर सुरु असलेल्या या उपक्रमाने ७.८३ टन एवढे थर्मोकोल रिसायकलिंगसाठी पाठवून कचरा संकलनासाठीच्या ३२ बीआरसी गाड्यांच्या लैंडफिलला होणाऱ्या फेऱ्या कमी केल्या आहेत. ज्यामुळे शहराचे केवळ पाच महिन्यात १.५ लाख रुपये वाचले आहेत. यामुळे थर्मोकोलच्या कचऱ्याचे शाश्वत पद्धतीने व्यवस्थापन हे ध्येय साध्य होत आहे.
या वेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, थर्मोकोलच्या सुरक्षित संकलन, वाहतूक आणि रिसायकलिंगसाठी के. के. नाग आणि स्वच्छने पुणे महानगरपालिकेच्या साहाय्याने महत्वाची पावले उचलली आहेत. स्वच्छ जनजागृती, कचरा वेचकांचे व मनपाच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि नागरिकांनी टाकून दिलेल्या थर्मोकोलचे वर्गीकृत संकलन या बाबतीत आघाडीने काम करेल. अशी आशा यावेळी व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक आदित्य माळवे, नगसेविका सोनाली लांडगे, राजश्री काळे, स्वीकृत सदस्य अपर्णा कुऱ्हाडे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, श्रीमती लक्ष्मी नारायण, चेअरमन मिलन नाग आदी मान्यवर उपस्थित होते.