बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा सन्मान.

0
slider_4552

बाणेर :

बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक/अध्यक्ष ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने बालेवाडी मनपा शाळेमध्ये ३८ वर्ष शिक्षण देणाऱ्या मुख्याध्यापिका ललिता डोंगरे / बांगर, आयआयटीचे शिक्षण पूर्ण करून केम्ब्रिज युनिव्हर्सिटी युके येथे पीएचडी करता निवड झालेले पार्थ राजेश देशपांडे, तसेच वकिलीची सनद प्राप्त झालेले ॲड. उदय दिलीप शेलार यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. पांडुरंग थोरवे यांनी केले. त्यांनी सत्कार मूर्ती गुरुवर्य ललिता डोंगरे / बांगर यांच्या शिकवण्याच्या पद्धती ची माहिती सविस्तर विशद केली. मॅडम ३८ वर्ष सेवा करत चांगले विद्यार्थी घडवण्याची किमया साधली असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पार्थ आणि उदय यांनी असेच यश मिळवत राहून नावलौकिक त्यामध्ये भर पाडावी असे सांगितले.

सत्कार करण्याकरता उपस्थित पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सल्लागार मोनिका वाडकर यांनी सत्कार मूर्तींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सत्कार करताना डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, बालेवाडी बाणेर परिसरातील विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मुख्याध्यापिका ललिता डोंगरे आणि आणि केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी साठी निवड झालेले पार्थ राजेश देशपांडे, तसेच वकिलीची सनद प्राप्त झालेले ॲड. उदय दिलीप शेलार यांनी बाणेर बालेवाडी परिसराच्या नाव लौकिकामध्ये भर टाकली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला पाठबळ देण्याकरिता त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. त्यांनी अशीच प्रगती दिवसेंदिवस करत राहावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी सत्कार मूर्ती मुख्याध्यापिका ललिता डोंगरे / बांगर,पार्थ राजेश देशपांडे, ॲड. उदय दिलीप शेलार, डॉ. दिलीप मुरकुटे, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. मोनिका वाडकर, ॲड. सुदाम मुरकुटे, संस्थेचे चेअरमन विजय विधाते व्हाईस चेअरमन शशिकांत दर्शने, सदस्य संजय ताम्हाणे, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. प्रिया देशपांडे संतोष भोसले उपस्थित होते.

 

See also  बाणेर येथे गरजू लोकांना शिवसेनेच्या वतीने धान्य कीट वाटप !