प्रो – कबड्डी लीगसाठी प्रदिप नरवाल, सिद्धार्थ देसाई यांना कोटीची बोली.

0

भारतात इंडियन प्रीमीयर लीगनंतर सर्वात लोकप्रीय लीग म्हणजे प्रो कबड्डी. आत्तापर्यंत प्रो कबड्डीचे ७ हंगाम पूर्ण झाले आहेत. पण गेल्या वर्षभरात कबड्डी वर्तुळात कोरोना व्हायरसच्या कारणाने शांतता होती.

पण काहीदिवसांपूर्वी प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाची घोषणा झाली आणि कबड्डी प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या ८ व्या हंगामासाठी २९, ३० आणि ३१ ऑगस्ट असे तीन दिवस खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

रविवारी (२९ ऑगस्ट) नवीन युवा खेळाडूंचा लिलाव झाला. यात केवळ ४ खेळाडूंना बोली लागली. मात्र, सोमवारचा दिवस (३० ऑगस्ट) बराच व्यस्त राहिला. कारण, मोठे आणि स्टार खेळाडू यंदा लिलावात सहभागी होते. सोमवारी परदेशी खेळाडूंचे, तसेच भारताच्या अ गटातील खेळाडूंचा लिलाव झाला.

सोमवारचा दिवस लक्षात राहिला, तो परदीप नरवालच्या बोलीमुळे. ‘डुबकी किंग’ परदीप नरवालला तब्बल १ कोटी ६५ लाखांची बोली लागली. त्यामुळे तो प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला युपी योद्धाने आपल्या संघात सामील केले आहे. त्याच्यापाठोपाठ या हंगामात सोमवारी सिद्धार्थ देसाईला किंमत मिळाली. त्याला एफबीएम कार्डचा वापर करत तेलुगु टायटन्सने १ कोटी ३० लाख रुपयांना संघात कायम केले. तसेच सोमवारी एकूण २२ परदेशी खेळाडूंना बोली लागली.

सोमवारी बोली लागलेले खेळाडू –

परदेशी खेळाडू –
मोहम्मदरेजा शादलो चियानेह – ३१ लाख – पटना पायरेट्स
अबोजार मिघानी – ३०.५ लाख – बंगाल वॉरियर्स
जेंग कून ली – २०.५ लाख – पटना पायरेट्स (एफबीएम कार्ड)
मोहसेन मघसौदलूजाफरी – १२.८० लाख – यु मुंबा
विक्टर ओबीएरो – १० लाख – पुणेरी पलटण
हामिद मिरजई नादेर – १२.१० लाख – हरियाणा स्टीलर्स
मोहम्मद मलक – १० लाख – दबंग दिल्ली
अबे टेटसुरो – १० लाख – तेलुगू टायटन्स
सोलेमन पहलेवानी – ११.५० लाख – गुजरात जायन्ट्स
हादी ओशतोरक – २० लाख – गुजरात जायन्ट्स
जिया उर रहमान – १२.२० लाख – बेंगलुरु बुल्स
अबुलफजल मघसौदलू – १३ लाख – बेंगलुरु बुल्स
डोंग जीऑन ली – १२.५० लाख – बेंगलुरु बुल्स
एमाद सेदाघट निया – १०.२० लाख – दबंग दिल्ली
मोहम्मद इस्माईल मघसौदलू – १३.२० लाख – हरियाणा स्टीलर्स
मोहम्मद अमीन नोसराटी – ११ लाख – जयपूर पिंक पँथर्स
आमिर हुसेन मोहम्मदमलेकी – १० लाख – जयपूर पिंक पँथर्स
अन्वर बाबा – १० लाख – तमिळ थलायवाज
मोहम्मद तुहिन तरफदेर – १० लाख – तमिळ थलायवाज
हयूनसु पार्क – १० लाख – तेलुगू टायटन्स
मोहम्मद मसूद करीम – १० लाख – युपी योद्धा
मोहम्मद ताघी – १२ लाख – युपी योद्धा

See also  युरो कप : इंग्लंड चा पराभव करून इटलीचे ५३ वर्षा नंतर विजेतपद

भारतीय अष्टपैलू खेळाडू (अ गट)
दिपक निवास हुडा – ५५ लाख – जयपूर पिंक पँथर्स (एफबीएम कार्ड)
रोहित गुलिया – ८३ लाख – हरियाणा स्टीलर्स

डिफेंडर्स (अ गट)
रविंद्र पहल – ७४ लाख – गुजरात लायनस्
विशाल भारद्वाज – ६० लाख – पुणेरी पलटण
बलदेव सिंग – ६० लाख – पुणेरी पलटण
सुरेंदर सिंग – ५५ लाख – तेलुगु टायटन्स
संदीप कुमार धूल – ४५ लाख – जयपूर पिंक पँथर्स (एफबीएम कार्ड)
सुरजीत सिंग – ७५ लाख – तमिळ थलायवाज
महेंदर सिंग – ५० लाख – बंगळुरू बुल्स (एफबीएम कार्ड)

रेडर्स (अ गट)
के प्रपंजन – ७१ लाख – तमिळ थलायवाज
सिद्धार्थ देसाई – १ कोटी ३० लाख – तेलुगु टायटन्स (एफबीएम कार्ड)
राहुल चौधरी – ४० लाख – पुणेरी पलटन (४० लाख)
परदीप नरवाल – १ कोटी ६५ लाख – युपी योद्धा
मनजीत दहिया – ९२ लाख – तमिळ थलायवाज
रोहित कुमार – ३६ लाख – तेलुगु टायटन्स
चंद्रन रंजित – ८० लाख – बंगळुरु बुल्स
प्रशांत कुमार राय – ५५ लाख – पटना पायरेट्स
सचिन तन्वर – ८४ लाख – पटना पायरेट्स
श्रीकांत जाधव – ७२ लाख – युपी योद्धा