यंदाचा राखीपौर्णिमा उत्सव समाजाचे रक्षण करणाऱ्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी : राजेंद्र धनकुडे

0
slider_4552

बाणेर :

नात्याची ओढ आणि आपुलकी एका रेशीम दोरीने घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधनाचा सण. बाणेर बालेवाडी येथे शिवसेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने आभाळ माया वृद्धाश्रम मधील ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत तसेच बाणेर बालेवाडी परिसरातील विविध क्षेत्रातील डॉक्टर नर्स तसेच कामगार यांना राखी बांधत रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे म्हणाले, ज्येष्ठांनी आपल्याला समाजामध्ये जगण्याचा आदर्श निर्माण केला आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांन सोबत सण उत्सव साजरे करताना खरा आनंद मिळतो. तसेच कोरोंना कालावधी मध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत किराणा घेऊन येणारे व अन्य साहित्य उपलब्ध करून देणारे कामगार देखील रक्षकाच्या भूमिकेत होते. म्हणूनच यंदाचा राखी पौर्णिमेचा उत्सव हा या समाजाचे रक्षण करणाऱ्या कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.

यावेळी उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, शिवसेनेच्या रोहिणी धनकुडे, विभाग प्रमुख संतोष तोंडे, रमेश जोशी, राजेश राणे, विलास साळी, सुलभा कुलकर्णी, पुष्पा शिंदे, काने, रासकर ,सुलभा, लक्ष्मी आदी उपस्थित होते.

 

 

 

See also  नवरात्रीचे 'नऊ दिवस, नऊ नारीशक्ती' उपक्रम : डॉ. सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात सूरु.