नमो मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूर्ती रातोरात हटवली, तर राष्ट्रवादीचे उपहासात्मक आंदोलन..!

0

औंध :

पुण्यातील औंध येथे बांधण्यात आलेल्या नमो मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूर्ती रातोरात हटविण्यात आली असून हे मंदिर बंद करण्यात आले आहे.

औंध गावातील मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारलं. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. देशभरात याबाबत मोठी चर्चा झाली. याबाबतचे वृत्त सोशल मीडियात व्हायरल देखील झालेत. दरम्यान, आज सकाळी औंधमधील मंदिर झाकण्यात आलं. त्यातील मोदींचा पुतळादेखील मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे. थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन हे मंदिर बंद करण्यात यावे अशी सूचना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवण्यात आल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ धाव घेतली. त्यांनी या भागात उपहासात्मक आंदोलन केलं. देशापुढे असलेले प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही साकडं घालायला मंदिरात आलो होतो. मात्र भाजपचा देव काही केल्या आम्हाला दिसत नाहीए. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे, यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो. पण देवच दिसत नसल्यानं आम्हाला अगदी भरून आलें असल्याची टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.

यापुढे पेट्रोल,डीझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे? आमच्या नवसाला कोण पावणार ? असा असंख्य सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले आहे. इतकेच नाही तर मुर्ती चोरी गेल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येणार. आता तरी महागाई कमी करणार का? असा सवाल करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप प्रशांत जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या वतीने मंदिराबाहेर आरती करण्यात आली. त्याच बरोबर पेट्रोल, डीजल, गोड तेल आणि मसाल्यांचा नैवद्य या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने दाखवण्यात आला आहे.

See also  बाणेर पिंपळेनिलख पुलाच्या कोनशिलेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख करण्याची आर पी आय ची मागणी.