पुणे:
पुण्यातले प्रसिद्ध उद्योगपती नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांना अखेर दीड महिना शोध घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे.
गणेश गायकवाड याने त्याची पत्नीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण करून कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी पहिला गुन्हा चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. यानंतर गणेश गायकवाड नानासाहेब गायकवाड यांच्यावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये खंडणी, बलात्कार जीवे मारण्याची धमकी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बाप लेकांसह आणखी दोघांवर मोकाची कारवाई केलेली होती. तेव्हापासून गेले दीड महिना गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड हे दोघेही फरार होते. त्यांच्या मागावर ती पुणे पोलिसांची अनेक पथके काम करत होती अखेरीस आज त्यांना कर्नाटक मधून अटक केल्याची माहिती समोर येते आहे. नानासाहेब गायकवाड हे चिंचवड चे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत.
दरम्यान, पुण्यात पैश्याच्या जोरावर गुन्हे करणा-या कॉंग्रेस नेत्यासह आठ जणांना मोक्का ठोठावण्यात आला होता. खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, खंडणी, पठाणी सावकारी, जागा बळकावणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या केदार ऊर्फ गणेश नानासाहेब गायकवाड व त्याचे वडील उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्या पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ते फरार होते, आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
गणेश गायकवाडांचे अनेक मोठ्या राजकीय आणि अध्यात्मिक गुरुंशी असलेले संबंध समोर आले होते. दरम्यान गायकवाडांवर गुन्हा दाखल होण्याच्या काही दिवस आधी मोरे गुरुजींनी गायकवाड यांच्या घरी पाहुणचार घेतला होता. गुरुजींचं हेलीकॉप्टर मधून झालेलं स्वागत आणि गायकवाड यांनी केलेला पाहुणचार पुण्यात चर्चेचा विषय ठरला होता.
त्याचबरोबर गायकवाड यांच्या विरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात 9 कोटी रुपयांची जमीन बळकवल्याचा गुन्हा जून महिन्यातच नोंदविण्यात आला होता. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची सूस येथील 1 एकर जागा गायकवाडांनी बळकावून त्यांची फसवणूक केली होती. तसेच 20 लाख रुपयाच्या मोबदल्यात 85 लाख रुपये व्याज्याच्या पैशापायी रायगड येथील 7 एकर जागा आणि पुण्यातील 4 गुंठे जागा बळजबरिने बळकावली असल्याची माहिती तक्रादाराने दिली होती. आमच्या सारख्या अनेक लोकांना गायकवाड यांनी त्रास दिला आहे. दरोडा, खंडणी, गोळीबार, अपहरणासह अवैध सावकारी व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून देखील गायकवाड पितापुत्र अद्याप मोकाट फिरत होते परंतू आता ते पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
नानासाहेब गायकवाड, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावयासह ८ जणांविरुद्ध पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली होती. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी याअगोदर गायकवाड कुटुंबावर “मोका’ अंतर्गत कारवाई केली होती. अनेक गुन्हे दाखल असलेल्या गायकवाड पिता-पुत्रांना कधी अटक होणार हा प्रश्न पुणेकर विचारत होते. परंतू आता त्यांना अटक केली आहे आणि या प्रश्नांना ब्रेक लागला आहे.