बाणेर बिटवाईज चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आली सिग्नल यंत्रणा

0

बाणेर :

नगरसेवक बाबूराव चांदेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २ ते ३ महिने स्वतः उभे राहून बाणेर येथील बीटवाइज चौक सुशोभीकरण करून घेतले. या बीटवाइज चौकात वाहतूक कोंडी होत होती. यामुळे नागरिकांनी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी केली होती. या नागरिकांच्या मागणीचा विचार करून नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी पाठपुरावा करू या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवून घेतली.

नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी संबंधित खात्यास पत्र व्यवहार करून , ट्राफीक सिग्नल मंजूर करून घेतला . २२जुलै २०२१ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिग्नल चे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक मासळकर, नितीन कळमकर, विशाल विधाते, अर्जुन ननावरे, प्रणव कळमकर, सुषमा ताम्हाणे, राखी श्रीराव, पुनम विधाते, डॉ मीना विधले, माधुरी इंगळे, मारुती नरके आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बोलताना सांगितले की, बिटवाईज चौक सुशोभिकरण केल्यानंतर या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी ही समस्या नागरिकांनी मांडली. ही समस्या सोडवण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवणे आवश्यक होते. या सिग्नल यंत्रणेमुळे या ठिकाणावरून वाहतूक कोंडी सुटणार असून याचा फायदा येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना होणार आहे.

See also  बाणेर येथील कोविड हॉस्पिटल मध्ये मृतांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रकार उघडकीस : चतुःश्रुंगी पोलिसांची कारवाई