मुळशी :
पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांच्या मार्फत योगीराज पतसंस्थेच्या सर्व संचालक व कर्मचारी यांना मल्हार माची रिसॉर्ट, मुळशी येथे प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले. तसेच भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी तसेच पश्चिम महाराष्ट्र सह प्रभारीपदी प्रल्हाद सायकर यांची निवड झाल्याबद्दल, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वकील सेल सचिवपदी सुदाम मुरकुटे यांची निवड झाल्याबद्दल तसेच ग्रीन बिल्डिंग डिझाईन राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याबद्द्ल सिद्धेश मारणे या सर्वांचा विशेष सत्कार प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी करण्यात आला.
प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, मुळशी पंचायत समितीचे मा.सभापती रविंद्र उर्फ बाबा कंधारे, मा.सरपंच समीर सातपुते यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच संस्थेचे संचालक आणि कर्मचारी प्रशिक्षित असावेत व ऑडीट मध्ये प्रशिक्षणाला 30 गुण असल्याने निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मल्हार माची रिसॉर्ट, मुळशी येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असे यावेळी सांगितले.
फेडरेशन तर्फे व्याख्याते अरुण रोडे यांनी ताळेबंद, निधी व भांडवल व्यवस्थापन आणि कोरोना नंतरच्या आलेल्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे या विषयी प्रशिक्षण दिले. तसेच संस्थेचा ताळेबंद पाहुन योगीराज पतसंस्था ही राज्यातील चांगल्या संस्थापैकी एक आहे असे नमूद केले.
संस्थेचे शाखा समिती सदस्य अनिल खैरे यांनी सुखी व तणाव मुक्त जीवनाचा मंत्र “आनंद” या विषयावर व्याख्यान दिले.
समारोप प्रसंगी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, स्थायी समिती माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबूराव चांदेरे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुरकुटे, भाजपा चे युवा नेते गणेश कळमकर, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीप मुरकुटे, मल्हार माची रिसॉर्ट चे संचालक रामदास मुरकुटे, राहुल पारखे, फेडरेशनच्या प्रशिक्षण प्रमुख निलाक्षी राऊत, संस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते. शाखाध्यक्ष शंकरराव सायकर यांनी स्वागत केले तर संचालिका रंजना कोलते यांनी सर्वांचे आभार मानले.