हडपसर :
पुणे शहराचे तिसरे रेल्वे स्टेशन आणि गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे हडपसर रेल्वे स्टेशन. आत्ता या हडपसर रेल्वे स्टेशनमधून स्वतंत्र वाहतूक सुरू होईल. 8 जुलै रोजी या स्टेशनमध्ये स्वतंत्र ट्रेन पोहोचेल आणि 9 जुलैला हैदराबादला रवाना होईल. अलीकडेच या स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेने या स्टेशनमधून रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आधीच पुणे शहरात शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्टेशन हे दोन स्टेशन आहे. पुणे स्टेशनमधून स्वतंत्र गाड्या सोडण्यात आल्या आहेत. पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर स्टेशनच्या आसपास रहिवासी लोकसंख्येचे प्रमाण बरेच आहे. जागेच्या अडचणीमुळे या स्टेशनचा विस्तार करता येणार नाही. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला पर्याय म्हणून हडपसर रेल्वे स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन वर्षांपासून हडपसर रेल्वे स्टेशनचे काम सुरू झाले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्व गाड्या या स्टेशनमधून सोडण्याचे नियोजन बनविले आहे. अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मोठे फ्लेटफॉर्म, वेटिंग रूम, एक्सलेटर, अत्याधुनिक तिकीट व्यवस्था, कॅटरिंग सेवा, पोलिस, पार्किंग इत्यादी सुविधा येत्या काळात टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील. पीएमपी, कॅब आणि रिक्षाने हडपसरहून पुण्याला जाता येते.
पूर्वी हड़पसर स्टेशन वर 16 डब्ब्यांच्या ट्रेन्स थांबत होत्या. प्लॅटफॉर्मच्या लांबीमुळे लांब ट्रेन येथे थांबत नव्हत्या. परंतु आता येथून 22 डब्यांच्या गाड्या या स्टेशनवर थांबतील. तसेच पुढच्या वर्षी गाड्यांचे 24 डबे येथून सुरू होतील. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
हैदराबादहून (07014) ही ट्रेन 8 जुलै पासून दर सोमवारी, गुरुवार आणि शनिवारी रात्री 08:30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 10:30 वाजता हडपसरला पोहोचेल. हडपसरहून (07013) ही गाडी 9 जुलै पासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी 03:30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 03:30 वाजता पोहोचेल. ही ट्रेन दौंड, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, लिंगमपल्ली आणि बेगमपेठ इत्यादी स्थानकांवर थांबेल.